बेलसरवाडी येथे बिबट्या जेरबंद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आंबेगाव तालुक्यातील बेलसरवाडी येथील काळकाई वस्ती परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अजून तीन बिबटे या परिसरात फिरत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.

leopard captured in belsarwadi brings relief to locals

मंचर : बेलसरवाडी (निरगुडसर) येथील काळकाई वस्ती (ता . आंबेगाव ) परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा मिळाला असल्याची माहिती मंचरचे वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात अद्याप आणखी तीन बिबटे फिरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.