‘भारत कारस्थानमुक्त’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत देश कारस्थानमुक्त झाल्याचे म्हटले. एनडीएच्या १२ वर्षांच्या राजवटीत देशाने प्रगती केली आहे. आता विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. एनडीएच्या घटक पक्षांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देत विकसित भारतासाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली आहे. हा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मांडला.

indias conspiracy free policy to accelerate progress

(पान एकवरून)

आहे, असा मंत्रही पंतप्रधानांनी स्वपक्षासह मित्रपक्षांना दिला. ‘एनडीए’च्या १२ वर्षांच्या राजवटीचे एक मोठे यश म्हणजे देश काँग्रेसच्या कारस्थानांमधून मुक्त झाला आहे. काँग्रेसने देशाला असहाय्यता, हताशा दिलीच, शिवाय भारतात जलद विकास अशक्य आहे, असा न्यूनगंडही दिला. मंद विकासाला काँग्रेसने चतुराईने ‘हिंदू ग्रोथ रेट’ असे नाव दिले. मंद विकासगतीचा कलंक देशाच्या मोठ्या हिंदू लोकसंख्येला लावला. वास्तविक या वाईट संस्कृतीला ‘काँग्रेस ग्रोथ रेट’ म्हटले जायला हवे होते’, असे टीकास्त्र मोदी यांनी सोडले.

‘आता देशातील प्रत्येक नागरिक विकसित भारताच्या स्वप्नाने भारलेला आहे. जे काल गरीब होते, ते आता ‘नवा मध्यमवर्ग’ बनले आहेत. त्यांच्यासाठी सरकार म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण रात्रंदिवस काम केले पाहिजे. १.४ अब्ज लोकांच्या या देशाने आमच्यावर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृढनिश्चयाने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आपण भारतातील तरुण, महिला, मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करायला हव्यात. देशातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आणि संकल्प बनले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण समर्पित केला पाहिजे’, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

‘एनडीए’चा ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या ध्येयासाठी काम करत राहण्याची प्रतिज्ञा करणारा ठराव सत्ताधारी एनडीएच्या घटक पक्षांनी बुधवारी मंजूर केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी हा ठराव मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व अन्य पक्षनेत्यांनी पाठिंबा दिला. या ठरावात मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि लोकसेवेतील अथक समर्पणाची प्रशंसा करण्यात आली आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या खऱ्या भावनेनुसार त्यांचे शासन नागरिकांच्या गरजांना प्रतिसाद देणारे, नावीन्यपूर्ण आणि बदल घडवून आणण्यात प्रभावी आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली, गेल्या १२ वर्षांमध्ये लोककेंद्रित विकास, लोकशाही आणि कामगिरी-आधारित शासनाचे एकत्रीकरण झाले आहे, असे ठरावात म्हटले आहे.