सीमेवर स्फोटात दोन जवान हुतात्मा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उत्तर काश्मीरमधील उरी येथे एक दुर्दैवी घटना घडली. शस्त्रांच्या हाताळणीदरम्यान झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील दोन शूर जवान हुतात्मा झाले. अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमेवर तैनात असताना त्यांनी आपले प्राण गमावले.

two soldiers martyred in border blast in uri

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील उरी येथे अपघाताने झालेल्या स्फोटात दोन जवानांचा बुधवारी मृत्यू झाला. स्फोटात जखमी झालेल्या या दोन्ही जवानांना श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दोन्ही जवानांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण अशी त्यांची नावे असून, दोन्ही जवान महाराष्ट्रातील आहेत. जाधव हे मूळचे साताऱ्याचे असून, बाळकृष्ण हे ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथील आहेत.

सीमेजवळील कमलकोट भागात ही घटना घडली. स्फोट कशाने झाला याची माहिती लगेच मिळू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रांच्या हाताळणीदरम्यान ही घटना घडली. दोन्ही जवान ८ राष्ट्रीय रायफल्समधील आहेत.