‘पंतप्रधान मोदींमुळेच महाराष्ट्राला विकासासाठी सर्वांत मोठी आर्थिक मदत मिळाली आहे’, असा गौरव उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला. ‘मोदी हे १.४ अब्ज भारतीयांच्या आकांक्षा आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून उदयास आले आहेत. ते भारतीयांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहेत व जागतिक स्तरावर भारताच्या गौरवाचे प्रतिनिधित्व करतात. गरिबांच्या कल्याणाचे आणि उन्नतीचे नाव म्हणजे मोदी. जागतिक स्तरावर भारताला मिळणाऱ्या सन्मानाचे नाव म्हणजे मोदी. देशाच्या भरारीचे नाव म्हणजे मोदी’, असे वर्णन शिंदे यांनी करताच कडकडाट झाला.

