‘गांधी कुटुंबाचे बलिदान’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवार यांनी गांधी कुटुंबाच्या बलिदानाची आठवण करून दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. या कुटुंबाचा त्याग अविस्मरणीय आहे. त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी मोठे योगदान दिले आहे.

sacrifice of the gandhi family a story of dedication for the nation

‘पंतप्रधान होण्याआधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचे काम केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ संघर्ष केला. अनेक वर्षे तुरुंगवास सोसला, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही’, असेही पवार म्हणाले. नेहरुंनंतर इंदिरा गांधींनी देशासाठी अहोरात्र काम केले, पाकिस्तानला धडा शिकवला. इंदिरा आणि राजीव गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. या कुटुंबाचा त्याग कोणीही विसरू शकत नाही, याची आठवण पवार यांनी करून दिली.