Officials Innocence Revealed In Sexual Harassment Case
विनयभंगाच्या गुन्ह्यातूनअधिकाऱ्याची मुक्तता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना विनयभंगाच्या आरोपातून दिलासा मिळाला आहे. जुन्नर न्यायालयाने त्यांच्यावरील गुन्हा खोटा ठरवला आहे. महिला शिक्षिकेने दाखल केलेल्या आरोपांची चौकशी झाली. न्यायालयाने 'बी समरी' अहवाल मंजूर केला. त्यामुळे प्रदीप देसाई यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मंचर : घोडेगाव येथील (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंग , शिवीगाळ व धमकीच्या आरोप प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांनी ‘बी समरी’ अहवाल मंजूर केला असून गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेने गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.