पाटस गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

महाराष्ट्र टाइम्स

पाटस येथील श्री सिमेंट कंपनीत सिमेंट लोडिंगवरून ट्रकचालकांच्या दोन गटात वाद झाला. हा वाद मिटवताना एका गटाने गोळीबार केला, तर दुसऱ्या गटाने लोखंडी गज व दगडांनी मारहाण केली. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विजय कोल्हे तपास करत आहेत.

patas shooting deepening disputes and complaints from both sides

यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस येथील श्री सिमेंट कंपनीमध्ये सिमेंट लोडिंगच्या मुद्द्यावरून दोन ट्रकचालक गटांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण मिटवण्यासाठी चर्चा करत असताना एका गटाने गोळीबार केल्याचा; तर दुसऱ्या गटाने लोखंडी गज व दगडांनी डोक्यात मारहाण केल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल केल्या असून, एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाटस गावातील लक्ष्मीबाप्पू गरदडे कॉम्प्लेक्ससमोर ही घटना घडली. सिमेंट कंपनीत ट्रकमध्ये सिमेंट भरताना झालेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये भांडण उफाळले. भांडण मिटवण्यासाठी बसले असताना एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला चढवल्याचे दोन्ही फिर्यादींनी सांगितले आहे. दोन्ही गुन्हे यवत ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. उपनिरीक्षक विजय कोल्हे दोन्ही प्रकरणांचा तपास करीत आहेत.