छत्रपती संभाजीनगर : एका महिलेला मोबाइलवर वारंवार अश्लील बोलणाऱ्या आरोपी भालचंद्र खरात याला सहा महिने साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. आहेर यांनी ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी तीन हजार रुपये भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेशात नमूद आहे.
४८ वर्षीय पीडितेला सहा मे २०१७ रोजी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने अश्लील बोलणे सुरू केले. त्याने पुन्हा सहा मे २०१७ रोजी फोनवरून अश्लील संभाषण केले. प्रकरणात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील जे. एम. मनवर यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार पांढरे यांनी काम पाहिले.











