Appointment Of Haribhau Gite As Chief Engineer A New Change In Soil And Water Conservation Department
मुख्य अभियंतापदी हरिभाऊ गिते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
छत्रपती संभाजीनगर येथे मृद व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंतापदी हरिभाऊ गिते यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांची जबाबदारी असेल. नवीन रचनेनुसार कामांना गती देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या नियुक्तीमुळे विभागाच्या कामांना नवी दिशा मिळेल.
छत्रपती संभाजीनगर : मृद व जलसंधारण विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन झालेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता पदावर हरिभाऊ गिते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांची जबाबदारी सोपविली आहे. कामांना गती देणे आणि नवीन रचनेनुसार अंमलबजावणीचे उद्दिष्ट त्यांच्यावर आहे.