मंत्रोच्चाराने दुमदुमले घृष्णेश्वर मंदिर

महाराष्ट्र टाइम्स

वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात अधिक मास पुरुषोत्तम मासानिमित्त १६ वा अतिरुद्र अभिषेक सोहळा पार पडला. हरिद्वारहून आणलेल्या गंगाजलाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देशभरातील वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चाराने अभिषेक केला. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टच्या सदस्यांनी हा महोत्सव यशस्वी केला.

atyrudra abhishek event at ghrishneshwar temple festival of devotees

अधिक मास पुरुषोत्तम मासानिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात १६ व्या अतिरुद्र अभिषेक सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर वैदिक मंत्रोच्चाराने दुमदुमून गेला होता.

पाच जून ते नऊ जून या दरम्यान झालेल्या अतिरुद्र अभिषेक सोहळ्यासाठी हरिद्वार येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाची सवाद्य मिरवणूक वेरूळनगरीतून काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात ‘हर हर महादेव’, ‘श्री घृष्णेश्वर भगवान की जय’ अशा जयघोषात ही मिरवणूक उत्साहात पार पडली. शिवभक्तांनी गंगाजल कलशाचे स्वागत केले.

या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदांची उपस्थिती लाभली. शास्त्रोक्त वैदिक मंत्रोच्चाराने पवित्र गंगाजलाने अभिषेक करण्यात आला. वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे, विश्वस्त संजय वैद्य, राजेंद्र कौशिके, योगेश टोपरे, मिलिंद शेवाळे, रवींद्र पुराणिक, दीपक अग्निहोत्री, सुमीत बाबरेकर, संकेत विटेकर, कैवल्य टोपरे, अनिल वेदपाठक, परेश देवपाठक, अथर्व विटेकर, नागेश वैद्य, अक्षय वैद्य, उमेश शास्त्री, श्रेयस पैठणकर, आदेश बाबरेकर, ओंकार जोशी, हन्नूशेठ अग्रवाल, जुगल किशोर वर्मा आदींनी परिश्रम घेतले.