गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथे मयुरी सचिन खरे या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी बाळाच्या रडण्याच्या आवाजाने घरात डोकावले असता हा प्रकार उघडकीस आला. पती आणि सासरच्यांविरुद्ध कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

कन्नड : तालुक्यातील भोकनगाव येथे मयुरी सचिन खरे (वय २२) या विवाहितेने सोमवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयुरी यांचे पती सचिन नंदू खरे घटनेच्या वेळी कामावर गेले होते; तर मयुरी हिचे सासूसासरे घरात नव्हते. शेजाऱ्यांना दुपारी घरातून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. बऱ्याच वेळानंतरही बाळ शांत होत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता त्यांना मयुरीने आत्महत्या केल्याचे दिसले. पती सचिन खरे, सासरे नंदू खरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मयुरीच्या नातेवाइकांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.