पालिकेचा अधिकाऱ्यांचा राज्यात अभ्यास दौरा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेला भेट दिली. कोल्हापूरमध्ये भांडवली मूल्यावर मालमत्ता कर आकारणी तर सोलापूरमध्ये ई-बिल पद्धत वापरली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या दौऱ्यात आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त विकास नवाळे आणि उपअभियंता संजय चामले सहभागी झाले होते. दौऱ्यातील चांगल्या बाबींची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त निर्णय घेतील.

पालिकेचा अधिकाऱ्यांचा राज्यात अभ्यास दौरा

छत्रपती संभाजीनगर : कोल्हापूरात भांडवलीमूल्यावर मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली आहे, तर सोलापुरात ई-बिल पद्धत अवलंबली जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या अधिकाऱ्यांनी नुकताच कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेचा अभ्यास दौरा केला.

दौऱ्यात आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त तथा करमूल्य निर्धारक व संकलक विकास नवाळे, उपअभियंता संजय चामले सहभागी झाले. विकास नवाळे यांनी पत्रकारांना माहिती दिली. दौऱ्यात ज्या चांगल्या बाबी लक्षात आल्या, त्या अंमलबजावणीबद्दल आयुक्त निर्णय घेतील असे नवाळे यांनी सांगितले.