सातारा परिसरात महापालिकेच्या पथकाने मंगळवारी मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम राबवली. या मोहिमेत चार तासांत केवळ तीन कुत्री या पथकाला पकडता आली. सातारा परिसरातील उमानगरमध्ये शनिवारी मोकाट कुत्र्याने तीन वर्षीय चिमुकलीवर हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. या चिमुकलीवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
नागरिकांनी संबंधित बालिकेला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मंगळवारी महापालिकेने दोन श्वान पथके उमानगर भागात पाठवली. परिसरात दोन्हीही पथकांनी, चार तासात केवळ तीन मोकाट कुत्रे या पथकांना सापडले. बुधवारी पुन्हा या भागात मोहीम राबवण्यात येणार आहे. पालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी शाहेद शेख यांनी ही माहिती दिली.











