येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत

महाराष्ट्र टाइम्स

खुलताबाद तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत १२ जून रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाईल. विशेष ग्रामसभेत सोडत काढण्यात येईल. १८ जून रोजी आरक्षणास मान्यता मिळेल आणि १९ जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध होईल. हरकती व सूचना २५ जूनपर्यंत स्वीकारल्या जातील.

reservation draw process announced for 26 gram panchayats in khultabad

‘राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार खुलताबाद तालुक्यातील २०२५ मध्ये मुदत संपलेल्या; तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे,’ अशी माहिती तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली.

खुलताबाद तहसील कार्यालयांमध्ये तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत आरक्षण सोडतीच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायतनिहाय आरक्षण सोडतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांची बैठक तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. २६ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया १२ जून रोजी पार पडणार आहे. त्यामुळे भावी सरपंचांना ग्रामपंचायत आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार २०२४ ते २०२५ मध्ये मुदत संपलेल्या; तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण निश्चितीची कारवाई करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग; तसेच सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या जागांची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभेची सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी आरक्षणास अधिकाऱ्यांची मान्यता मिळणार असून १९ जून रोजी प्रारूप आरक्षण सोडत प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी १९ ते २५ जून हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त हरकतीवर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन अंतिम आरक्षणास मंजुरी देण्यात येणार आहे. अंतिम आरक्षण रचना १० जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.