‘वृक्षवल्ली टीम’च्या वतीने वृक्षारोपण

महाराष्ट्र टाइम्स

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिल्लोड येथील वृक्षवल्ली टीमने मांडणा येथे पर्यावरणप्रेमी शेतकरी साहेबराव कल्याणकर यांचा गौरव केला. कल्याणकर यांनी आपल्या शेतातील आंब्याचा महावृक्ष पाच पिढ्यांपासून जपला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत टीमने त्यांच्या शेतात वृक्षारोपण केले. सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन आणि भवन येथेही वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.

vrikshavalli team organizes tree plantation on world environment day

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिल्लोड वृक्षवल्ली टीमच्या वतीने मांडणा येथील शेतकरी साहेबराव कल्याणकर यांनी त्यांच्या शेतामध्ये आठ गुंठे परीघ जागा व्यापलेला आंब्याचा महावृक्ष न तोडता जवळपास चार ते पाच पिढ्या सांभाळ केला.

त्यांचा हा व्यापक विचार सर्वच शेतकऱ्यांपर्यंत पोहचला पाहिजे त्यांचे अनुकरण सर्वांनीच केले पाहिजे म्हणून वृक्षवल्ली टीमने पुढाकार घेत कल्याणकर कुटुंबाचा या पर्यावरणदिनी सत्कार करून आणि त्यांच्या शेतात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

या सोबतच ग्रामीण पोलिस स्टेशन सिल्लोड व भवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी वृक्षवल्ली टीमचे डॉ. शेखर दौड, डॉ. नीलेश मिरकर, योगेश दिवटे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. विशाल आकते, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. भूषण पाटील, डॉ. विक्रांत लुटे, डॉ. विनोद लोखंडे, प्रा. शिवराम साखळे, भवन मंडळ अध्यक्ष एकनाथ हिवाळे, साहेबराव कल्याणकर, सामाजिक वनीकरण अधिकारी ए. टी. पाटील, वनपाल एस. जी. गाडेकर, कर्मचारी आर. टी. राठोड, जे. एन. चाथे, पी. एन. राजपूत, जी. वाय. परदेशी, के. जी. साखळे आदींची उपस्थिती होती.