सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण व महाविद्यालय, एनसीसी विभाग व राजर्षी शाहू ॲकॅडमीतर्फे अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयातील व तालुक्यातील यशस्वी २१ विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच झाला.
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांच्यापासून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित, उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे तसेच एनसीसी कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘अग्निवीर’मध्ये निवड झालेल्या सागर भोसले, गणेश सुरे, वैभव चरवंडे, मयूर हिवाळे, तेजस जंजाळ, यश पंडित, अभिषेक फोलाने, वैभव भोसले, बबलू सोनवणे, दीपक काळे, दत्ता बर्डे, गणेश वराडे, आकाश काळे, अजय काकडे, नागेश समिंद्रे, पवन पालोदकर, वैभव सपकाळ, तुषार बावस्कर, राधेश्याम तंबडे, आदित्य मादणीकर, दीपक मिसाळ आदी विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी कामठी (नागपूर) येथे यशस्वीरीत्या रिफ्रेशर कोर्स पूर्ण करून कॅप्टन पदाची पदवी प्राप्ती केल्याबद्दल त्यांचाही संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी केले. डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथपाल ज्ञानेश्वर हिलाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.









