डॉ. विजय मातकर यांचा सन्मान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. विजय मातकर यांना एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीत मानद लेफ्टनंट पद मिळाले. तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना हे पद देण्यात आले. संस्थेचे प्रमुख मानसिंह पवार यांनी त्यांचा सत्कार केला. छत्रपती संभाजीनगर येथे दैवज्ञ सुवर्णकार समाज मंडळ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहे. सिल्लोड येथील द्वारकाबाई गव्हाणे यांचे निधन झाले.

डॉ. विजय मातकर यांचा सन्मान

कन्नड : शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख तसेच इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलचे संचालक डॉ. विजय मातकर यांना नागपूर (कामठी) येथील एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी येथे मानद लेफ्टनंट पद प्रदान करण्यात आले. तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना हे पद देण्यात आले. ले. डॉ. विजय मातकर यांचा संस्थेचे प्रमुख मानसिंह पवार यांनी सत्कार केला. प्राचार्य डॉ. विजय भोसले, डॉ. कारभारी मगर,डॉ. संतोष देशमुख, विलास पवार, रामभाऊ करवंदे उपस्थित होते.

गुणगौरव कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : दैवज्ञ सुवर्णकार समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका १५ जूनपर्यंत पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी अनिल शेलार, मयुर पंचदाने, संजय मालवणकर, बालाजी रोडसमुद्रे, अनिकेत पळसकर, गणेश माहोरकर आदींशी संपर्क साधावा.

द्वारका गव्हाणे

सिल्लोड : सिल्लोड येथील द्वारकाबाई माणिकराव गव्हाणे (वय ७३) यांचे बुधवारी निधन झाले. त्या गोपीनाथ बाळा दौड यांच्या बहीण होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा विजय माणिकराव गव्हाणे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.