बालासोर (ओडिशा) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून ( डीआरडीओ ) येत्या काही दिवसांत एका क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येणार असून, त्यासाठी बालासोर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी चंडीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या (आयटीआर) लाँच पॅड-३च्या साडेतीन किलोमीटर परिसरातील ११ वाड्यांमधील ११,४४२ रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर केले.
प्रशासनाने क्षेपणास्त्र किंवा चाचणीच्या स्वरूपाबाबत तपशील उघड केला नसला, तरी स्थलांतरित केलेल्या लोकांना राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










