बांधाच्या वादातून बेदम हाणामारी

महाराष्ट्र टाइम्स

वांजोळा येथे शेतातील बांधावरून दोन गटात वाद झाला. या वादातून बेदम हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारीवरून एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

violent clash over bund issue in wanjola case registered against 13 individuals

शेतातील बांधावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले. ही घटना बुधवारी वांजोळा (ता. सिल्लोड) येथे घडली. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून १३ जणांच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘शेतात जनावरे पाणी पाजण्यासाठी गेलो असता सारदारसिंग जाधव बांधावरील गवताचे बेट काढत होता. बांध खोदू नको असे समजावून सांगत असताना हातातील कुदळीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. इतर आठ जणांनी घरी येऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली,’ अशी तक्रार गजानन कापरसिंग जाधव (४९, रा. वांजोळा) यांनी दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरदारसिंग नामदेव जाधव, लक्ष्मण सरदारसिंग जाधव, राम सरदारसिंग जाधव, विठ्ठल नामदेव जाधव, अमोल विठ्ठल जाधव, अंबरसिंग नामनाथ जाधव, कोमल अंवरसिंग जाधव, गोपाल सरदार सिंग जाधव, गणेश संजय जाधव (रा. सर्व वांजोळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या तक्रारीत शेतात ठिंबक पांगवत असताना गजानन जाधव शेतात आला. बांध का कोरत आहे, असे त्याने विचारले असता मी समजावून सांगत असताना हातातील कुदळीने हातावर मारहाण करीत जखमी केले. त्याचप्रमाणे तीन जणांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सरदारसिंग नामदेव जाधव (६५, रा. वांजोळा) यांनी दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवर गजानन कापरसिंग जाधव, नामदेव कापरसिंग जाधव, शुभम नामदेव जाधव, जानेश्वर गजानन जाधव (रा. सर्व वांजोळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार यतीन कुलकर्णी करीत आहे.