सागर शिंदे यांना ‘हुतात्मा’ घोषित करा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गावदेवी मार्केटला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले. नगरसेवक सीताराम राणे यांनी शिंदे यांना 'हुतात्मा' घोषित करण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेने यापूर्वी अशाच परिस्थितीत शहीद झालेल्या जवानांना 'हुतात्मा' घोषित केले होते. त्याच धर्तीवर सागर शिंदे यांना सन्मानित करण्याची मागणी जोर धरत आहे.

demand to declare sagar shinde as martyr

ठाणे : गावदेवी परिसरात झालेल्या अग्निकांडात आग विझवण्याचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांना ‘हुतात्मा’ घोषित करावे, अशी मागणी नगरसेवक सीताराम राणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या २१ मे रोजी गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. यावेळी बचावकार्य करताना जवान सागर शिंदे यांना वीरमरण आले. मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी 'गोकुळ हाऊस' इमारतीला लागलेली आग विझवताना मृत्यूमुखी पडलेल्या अग्निशमन दलातील चार अधिकाऱ्यांना ‘हुतात्मा’ घोषित केले होते. त्याच धर्तीवर सागर शिंदे यांना ‘हुतात्मा’ घोषित करावे, अशी मागणी राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.