नेमबाजी प्रशिक्षक राणा यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारताचे सर्वोत्तम पिस्तूल नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन झाले. मनू भाकेरला ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ४९ वर्षीय राणा यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. उपचारांना प्रतिसाद देत असतानाच झोपेतच त्यांची हृदयक्रिया बंद पडली.

नेमबाजी प्रशिक्षक राणा यांचे निधन

भारतातील सर्वोत्तम पिस्तूल नेमबाजांपैकी एक; तसेच मनू भाकेर हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्राँझपदके मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे हृदयाशी संबंधित आजारामुळे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राणा यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी रीना राणा, मुलगी देवांशी, मुलगा युवराज, वडील नारायणसिंह राणा असा परिवार आहे.

‘जसपाल यांनी दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला,’ अशी माहिती राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष कलिकेश नारायणसिंह देव यांनी दिली. ‘एक जून रोजी जसपाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हाच त्यांची तब्येत खूप नाजूक होती. त्यांना तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. राणा उपचाराना प्रतिसाद देत बरे होत होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार होते. मात्र, दुर्दैवाने झोपेतच हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला,’ असे ‘मॅक्स’चे डॉक्टर बलबीरसिंह यांनी सांगितले.