Kalyan Station Development Project Incomplete Work After Five Years
पाच वर्षांनंतरही काम अपूर्णच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कल्याण स्टेशन परिसरातील सॅटीससह परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१ पासून सुरू आहे. पाच वर्षे उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. एसटी आगाराचा विकास आणि बहुमजली इमारतीचे काम सुरू आहे. उड्डाणपूल आगारात उतरवण्यासाठी कल्याण आगार विठ्ठलवाडीत हलवण्यात आले आहे. या रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
कल्याण स्टेशन परिसरात 'सॅटीस'सह परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१पासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांतही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. याच प्रकल्पाचा भाग म्हणून एसटी आगाराचा विकास आणि बहुउद्देशीय बहुमजली इमारतीचे काम सुरू आहे. हे काम आणि उड्डाणपूल आगारात उतरवण्याच्या कामासाठी कल्याण आगार विठ्ठलवाडीत हलवण्यात आले आहे.