पुढील रविवारी, २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’च्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शुक्रवारी विद्यार्थीस्नेही बदल जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी वाढवून देण्यात आला असून कच्च्या कामासाठी याआधी प्रश्नपुस्तिकेत असलेल्या दोन पानांची संख्या आता चार करण्यात आली आहे.
नव्या नियोजनानुसार नीट-यूजी परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होईल. यापूर्वी परीक्षेसाठी १८० मिनिटांचा कालावधी होता. आता तो १९५ मिनिटांचा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त १५ मिनिटे मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी, ओळख पडताळणी, तपासणी आणि इतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही वेळ राखून ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी (पान १२वर)











