चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात ओव्हरहेड वायरवर तार कोसळल्याने शुक्रवारी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सकाळी गर्दीच्या वेळेत सुमारे ४० मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला.
चेंबूर ते टिळकनगरदरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता ओव्हर हेडवायरवर तार कोसळली. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अप हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. सकाळी कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी प्रवासी लोकलची वाट पाहत स्थानकात उभे होते. लोकलच येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. स्थानकादरम्यान (पान १२वर)











