आणखी महिनाभर एसटीचा प्रवास महागच

महाराष्ट्र टाइम्स

एसटीचा प्रवास अजून एक महिना महागणार आहे. १५ जुलैपर्यंत हंगामी भाडेवाढ लागू राहणार आहे. महागाई आणि इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील लाखो एसटी प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. एसटी महामंडळाने खर्चात झालेली वाढ हे कारण सांगितले आहे.

st travel hits another month of price hike

आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या राज्यातील ५४ लाखांहून अधिक एसटी प्रवाशांना आता आणखी एक आर्थिक फटका बसला आहे. १५ जून रोजी संपुष्टात येणार असलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्याऐवजी एसटी महामंडळाने ती आणखी एका महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास आता १५ जुलैपर्यंत महागच राहणार आहे.

महामंडळाने या मुदतवाढीमागे जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, इंधनाच्या वाढलेल्या किंमती, वाहनाचे सुटे भाग आणि देखभाल खर्चात झालेली वाढ यांचा दाखला दिला आहे. एसटी महामंडळाचे (पान १२वर)