काही क्षण बेशुद्ध, त्यानंतर सात गोल रोखले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कतार आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामन्यात गोलरक्षक अबुंदाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सामन्याच्या सुरुवातीला तो बेशुद्ध झाला तरी त्याने स्वित्झर्लंडचे सात गोल रोखले. त्याच्या या कामगिरीमुळे कतारने सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. अबुंदाच्या धाडसी बचावामुळे कतारचा पराभव टळला. फिफाने व्हीएआर तंत्रज्ञान काम करत नसल्याचे सांगितले.

काही क्षण बेशुद्ध, त्यानंतर सात गोल रोखले

गोलरक्षक अबुंदाने झेप घेतली, त्यावेळी त्याचे डोके रेमो फ्राऊलरला लागले. त्याला गोलची संधी होती, त्यामुळे पेनल्टी देण्यात आली. मात्र रेमो हाच ऑफसाइड होता, त्यामुळे तो प्रयत्नच अवैध ठरतो, असा अनेकांचा दावा आहे. आश्चर्य म्हणजे, ते दाखवणारी व्हिडीओ असिस्टंट रेफरी तंत्रज्ञानच काम करीत नव्हते, असा दावा ‘फिफा’ने केला आहे.

कर्णधार बॉआलेम खोकी याने भरपाई वेळेतील चौथ्या मिनिटास केलेल्या हेडरमुळे कतारने वर्ल्ड कप स्पर्धेतील स्वित्झर्लंडविरुद्धची ब गट साखळीतील लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली, असे गोलफलक दाखवत आहे. प्रत्यक्षात गोलरक्षक मोहम्मद इब्राहिम अबुंदा याने स्वित्झर्लंडचे किमान सात गोल रोखले आणि तेही काही क्षण बेशुद्ध झाल्यावर. त्यामुळेच कतारने त्यांच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभव टाळला.

अबुंदाच्या डोक्याला सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांत लागले. त्यानंतर त्याची शुद्ध काही क्षण हरपली. मैदानात त्याला तपासण्यात आले. मात्र अबुंदा काही मिनिटांत पुन्हा गोलरक्षणास तयार झाला. दरम्यान, अबुंदा जायबंदी झाला होता. त्याचा रिप्ले पाहून त्याची चूक असल्याचा निर्णय झाला होता. स्वित्झर्लंडच्या ब्रीर एम्बोलो याने ही किक सत्कारणी लावली. संपूर्ण सामन्यात ही किक देण्याचीच चूक अबुंदाकडून घडली. मात्र त्यानंतर केलेल्या अप्रतिम गोलरक्षणामुळे कतारविरुद्ध दुसरा गोल झाला नाही.

खरे तर कतार संघातील सर्व खेळाडूंनी आपले सामन्याचे मानधन अबुंदाला द्यायला हवे. त्याच्या चुकीमुळे पहिला गोल झाला, पण त्यानंतर त्याने चार किक रोखल्या. दोनदा चेंडू अचूक पंच केला आणि एकदा गोलच्या दिशेने येणाऱ्या चेंडूची दिशा बदलली, ही एक्सवरील टिपणी सर्व काही सांगते. फिफाच्या फुटबॉल डाटा प्लॅटफॉर्मनुसार स्वित्झर्लंडने गोलचे २६ प्रयत्न केले. त्यातील नऊ प्रयत्न रोखले गेले, असे म्हटले आहे.

१५व्या मिनिटांस गोलच्या दिशेने रोखणारा हेडर रोखण्यासाठी अबुंदा झेपावला. यावेळी त्याचे डोके गोल करण्याची संधी असलेल्या रेमो फ्रेऊलरच्या मांडीवर लागले. अबुंदा त्यानंतर मैदानावर पडला. तो काही क्षण प्रतिसाद देत नव्हता. त्याची मैदानातच तपासणी करण्यात आली. काहींच्या मते त्याच्या कवटीला धक्का बसला होता. मात्र त्यानंतरही त्याला खेळण्यास परवानगी देण्यात आली. व्हिडिओ असिस्टंट रेफरींनी हा प्रयत्न नियमानुसार असल्याचा निर्णय देत स्वित्झर्लंडला किक दिली होती. अबुंदा यानंतर जणू आक्रमणास सामोरे जाण्यास जास्तच तयार झाला. त्याने स्विस धडाका रोखला. ‘अबुंदाने त्याच्या दिशेने येणारी किक रोखली. तोच दोन संघातील फरक होता. त्याला लाभलेली शिस्तबद्ध बचावात्मक खेळाची साथ विसरता येणार नाही,’ असे भारताचा फुटबॉलपटू बाईचुंग भुतिया याने नमूद केले.