प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

Contributed byम.टा. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव
राममंदिरातील कथित दानचोरीवरून काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवाराची तुलना थेट महमूद गझनवी याच्याशी करताना, ते सर्व रामाच्या नावाखाली लूटमार करत आहेत, असा हल्लाबोल केला. एकेकाळी गझनवीने सोमनाथ मंदिर लुटले, त्याचपध्दतीने संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सध्या राममंदिर लुटत आहेत, अशी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.

‘नीट-यूजी’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला असला तरी त्यांच्याविरोधातील रोष वाढतच असल्याचे चित्र आहे. प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. ‘हा विद्यार्थ्यांचा आवाज संपूर्ण देशभरात मोठ्याने ऐकू येईल’, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी सांगितले.
‘आपल्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर होणारी निदर्शने ही विघटनकारी घटकांची ‘बी-टीम’ आहे. ज्यांना लोकशाहीत नाकारण्यात आले ते आता वेष बदलून व्यवस्थेच्या मागे लागले आहेत. हे लोक देशाचे विभाजन करू इच्छितात, त्यांच्यासाठी ते घोषणाबाजी करतात’ असे प्रधान मंगळवारी म्हणाले होते. या विधानावरून खर्गे यांनी प्रधान यांना लक्ष्य केले. केंद्र सरकारने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आणि परीक्षेतील अनियमिततेविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप खर्गे यांनी ‘एक्स’द्वारे केला.

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात तब्बल ९० वेळा पेपर फुटले असून, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, या सरकारचे शिक्षणमंत्री प्रधान आपल्या पदाला चिकटून आहेत आणि मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांना ‘दहशतवादी’ म्हणत आहेत. याआआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना संसदेत ‘आंदोलनजीवी’ आणि ‘परजीवी’ म्हटले होते हे देश विसरलेला नाही,’ असे खर्गे म्हणाले.