धर्म उपासकांच्या हत्येचा तपास ‘एनआयए’कडे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
shooting of religious worshippers in manipur church investigation transferred to nia
नवी दिल्ली : मणिपूरमधील चर्चमधील धर्म उपासकांच्या हत्याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आला असून, संस्थेने याप्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गेल्या महिन्यात १३ मे रोजी मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात तीन चर्चमधील धर्म उपासकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तर चार जण जखमी झाले होते. हा हल्ला राज्यातील अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घडला. मृतांमध्ये थादौ बॅप्टिस्ट असोसिएशनचे (टीबीए) सदस्य असून, ते चुराचांदपूर येथे झालेल्या धार्मिक संमेलनातून परतत असताना ही घटना घडली होती.