नागपूर : सीएचा मोबाइल हॅक करून सायबर गुन्हेगाराने बुटीबोरीतील सालासार आलोय इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ९८ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अभिजित मोरे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, मानेवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सायासारचे संचालक राधेश्याम मालू श्रवणकुमार मालू आहेत. २० जूनला सायबर गुन्हेगाराने मोरे यांचा मोबाइल हॅक केला. मालू यांच्या नावे त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांना तत्काळ ९८ लाख ५० हजार रुपये दिलेल्या खात्यात वळते करण्यास सांगितले.