नऊ झोनमधील पाणीपुरवठा बाधित?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
water supply disrupted in nine zones of nagpur what to do urgently
नागपूर : महावितरणच्या मनसर उपकेंद्रातील बिघाडामुळे नवेगाव रॉ वॉटर पम्पिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे कच्च्या पाण्याचे पम्पिंग बंद पडल्याने शहरातील नऊ झोनमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महावितरणचे पथक सध्या बिघाडाचे नेमके कारण आणि ठिकाण शोधण्याचे काम करीत आहे. वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब झाल्यास जलशुद्धीकरण आणि वितरण प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याची माहिती नागपूर महापालिका व ओसीडब्ल्यू प्रशासनाने दिली. ओसीडब्ल्यूच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, आशीनगर आणि मंगळवारी या नऊ झोनमधील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहू शकतो.