कर्नाटकमध्ये एका संशयितास अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
arrest of a youth with links to terrorist organizations in karnataka
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून येथून एका तरुणास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. सुहैल (२०) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो अलीकडेच येथील हरिहर तालुक्यातील एका गावात वास्तव्यासाठी आला होता व तेथे तो रंगाऱ्याचे काम करत होता, असेही पोलिसांनी सांगितले.

हरिहर तालुक्यातील एक तरुण पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए ) कर्नाटक पोलिसांना दिली होती. यानंतर गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साथीने पोलिसांनी कारवाई करत सुहैलला मंगळवारी अटक केली. त्याच्या व्हॉट्सॲप खात्यात दहशतवादाशी संबंधित मजकूर आढळला. तसेच, पाकिस्तानमधील अनेक जणांच्या तो संपर्कात होता असेही दिसून आले, अशी माहिती दावणगिरीचे पोलिस अधीक्षक शेखर एच. टेक्कनवार यांनी दिली.