माजी जगज्जेते थोडक्यात बचावले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ब्राझीलचा मोरोक्कोविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. व्हिनिशियस ज्युनियरने गोल करून ब्राझीलची हार टाळली. कार्लो ॲन्सेलितो यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलचा दोन दशकांचा वर्ल्ड कप विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न अजून लांबला आहे. मोरोक्कोने २१व्या मिनिटाला इस्माईल साल्बरीच्या गोलने आघाडी घेतली होती. ब्राझीलचा खेळ उणिवांनी भरलेला दिसला.

brazil narrowly escaped against morocco

दोन दशकांचा वर्ल्ड कप विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने ब्राझीलने प्रथमच परदेशी मार्गदर्शक कार्लो ॲन्सेलितो यांच्याकडे सूत्रे सोपवली. मात्र, माजी जगज्जेत्यांच्या खेळातील उणिवा मोरोक्कोविरुद्धच्या सामन्याने जास्तच उघड केल्या. व्हिनिशियस ज्युनियरने केलेल्या गोलमुळे ब्राझीलला हार टाळता आली आणि त्यांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

ब्राझीलने शेवटचा वर्ल्ड कप २००२मध्ये उंचावला आहे. त्यानंतर ते या यशापासून दूरच आहेत. मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यातील ब्राझीलच्या खेळाची तुलना अनेकांनी २०१४च्या स्पर्धेतील जर्मंनीविरुद्धच्या १-७ या लाजीरवाण्या पराभवाशी केली. पूर्वार्धात चेंडूवर नियंत्रण राखणेही ब्राझीलला जमत नव्हते. त्याचा फायदा घेऊन इस्माईल साल्बरी याने मोरोक्कोला २१व्या मिनिटास आघाडीवर नेले. रियल माद्रिदचा अनेकदा तारणहार ठरलेल्या व्हिनिशियसने ३२व्या मिनिटाला गोल करून ब्राझीलची लाज राखली.