‘चित्रकल्प’मधून आपटे कुटुंबाने जपला चित्रकला प्रशिक्षणाचा वारसा

Contributed byप्रसाद पानसेPrasad.Panse@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील 'चित्रकल्प आर्ट इन्स्टिट्यूट'ने चित्रकला प्रशिक्षणाचा वारसा जपला आहे. गं. कृ. आपटे यांनी १९६१ मध्ये सुरू केलेल्या या संस्थेचा विस्तार झाला आहे. मिलिंद आपटे यांनी अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू केले. मानसी आपटे व्यवस्थापन पाहतात. अथर्व आपटे यांच्या रूपात चौथी पिढीही आता सक्रिय झाली आहे. संस्थेच्या अनेक शाखा आहेत.

‘चित्रकल्प’मधून आपटे कुटुंबाने जपला चित्रकला प्रशिक्षणाचा वारसा

आपटे यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी मिलिंद आपटे यांनी सन १९९०पासून संस्थेत लक्ष घालण्यास सुरुवात केली. पूर्ण वेळ संस्थेचे कामकाज पाहताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्टेन ग्लास, कॅन्व्हास पेंटिंग, म्यूरल, ग्रिटिंग, वारली पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, कॅलिग्राफी, मग पेंटिंग, इजिप्त पेंटिंग, पोट्रेट रांगोळी, कॉफी पेंटिंग, बॉलपेन पेंटिंग असे नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी कला प्रदर्शनांवर भर दिला. दुसरीकडे संस्थेचा विस्तारही झाला. संस्थेची मुख्य शाखा सदाशिव पेठेत सुरू आहे. शहराचा विस्तार आणि विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेता धनकवडी, मुकुंदनगर, मार्केट यार्ड (कोंढवा रस्ता), आनंदनगर (सिंहगड रस्ता), येथेही चित्रकल्पच्या शाखा आहेत. मिलिंद यांच्या पत्नी मानसी संस्थेच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात, तर मिलिंद यांचे चिरंजीव अथर्व यांच्या रूपात चौथी पिढीही या व्यवसायात लक्ष घालत आहे.

पुणे : चित्रकलेच्या सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सन १९६१मध्ये सुरू झालेल्या साध्या शिकवणी वर्गांचे पुढे ‘चित्रकल्प आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ये रूपांतर झाले.

‘चित्रकल्प’मधून आपटे कुटुंबाने जपला चित्रकला प्रशिक्षणाचा वारसा

‘चित्रकल्प’मधून आपटे कुटुंबाने जपला चित्रकला प्रशिक्षणाचा वारसा

लोकप्रियता वाढत गेली, तसा विद्यार्थ्यांचा ओढाही वाढला. परीक्षांच्या अभ्यासक्रमाबरोबरच छंद वर्ग आणि काळानुरूप नवनव्या अभ्यासक्रमांचीही भर पडली. त्यामुळेच आठ-दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दर वर्षी शेकडो नव्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. आपटे कुटुंबीयांची चौथी पिढी आता या व्यवसायात सक्रिय झाली आहे.

चित्रकार गं. कृ. आपटे यांनी सेवानिवृत्तीनंतर सन १९६१मध्ये आठ-दहा विद्यार्थ्यांसाठी आपल्या घरीच शिकवणी वर्गांच्या स्वरूपात या संस्थेची स्थापना केली. चित्रकार रावसाहेब पिंपळखरे यांचे ते शिष्य. सन १९६५मध्ये घरगुती वर्गांचे रूपांतर चित्रकला क्लासमध्ये झाले. चित्रकलेच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती; तसेच छंद म्हणून शिकायला येणारी लहान मुले व तरुणांचेही प्रमाण वाढू लागले. या टप्प्यावर क्लासची जबाबदारी त्यांचे चिरंजीव आनंद आपटे यांनी स्वीकारली. ते स्वतः ‘आर्ट मास्टर’ होते व खडकी येथे लाल बहादूर शास्त्री शाळेत चित्रकला शिक्षक होते. त्यांनी इन्स्टिट्यूटचे संचालकपद कल्पना आपटे यांना दिले. सन १९७०मध्ये संस्थेचे नावही ‘चित्रकल्प’ असे ठेवले. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संस्थेत शासकीय परीक्षा वर्गांबरोबरच छंद वर्ग, पोट्रेट, पेंटिंग; तसेच ट्रेसर कोर्स असे नवनवे वर्गही सुरू झाले. विद्यार्थ्यांकडूनच क्लासची प्रसिद्धी होत असल्याने वेगळ्या प्रसिद्धीची गरज भासली नाही.

क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक व्हावे, यासाठी संस्थेने बालगंधर्व कलादालनामध्ये सन १९८१मध्ये संस्थेचे पहिले प्रदर्शन भरविले. सन १९८६ मध्ये संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले. रौप्यमहोत्सवानिमित्त शाळा- शाळांमधून चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. संस्थेचे दुसरे कलाप्रदर्शन त्या वेळी भरवले गेले. संस्थेचे अध्यक्ष वा. भा. घाटोळे यांनीही या सर्व कार्यक्रमांना सहकार्य केले; तसेच संस्थेचे विद्यार्थी असलेले प्रभाकर जोशी यांचा या रौप्यमहोत्सवाच्या कामात सिंहाचा वाटा होता. सध्या बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शन सुरू असून, आज, मंगळवारी त्याचा शेवटचा दिवस आहे.