Amar Rajurkars Third Selection In Legislative Council In Nanded A Victory Of Loyalty
नांदेडमध्ये निष्ठेला बळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नांदेड : राजकारणात संघर्ष करताना नेत्याची निष्ठा कायम ठेवायची असा कानमंत्र घेतलेल्या अमर राजूरकर यांची सोमवारी विधान परिषदेवर तिसऱ्यांदा निवड झाली. त्यांची निवड म्हणजे एक प्रकारे निष्ठेला बळ मानले जाते.
नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याच नांदेड मधून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तयार झाले. स्थानिक प्राधिकरण निवडणुकीमध्ये जिल्ह्यात काँग्रेसला यश मिळाले, सुरुवातीच्या काळात काही दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले पण गेल्या तीन वेळेपासून आमदार राजूरकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम केले. त्यांच्या वयाचे असलेले अनेक जण त्यांच्या आजूबाजूला होते, पण राजकारणातल्या चढ-उतारात अनेक आणि त्यांची साथ सोडली, या काळात राजूरकर मात्र त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले.राजूरकर यांनी गेल्या काही दिवसात संपूर्ण जिल्ह्यात भाजपने वातावरण कसे होईल यासाठी प्रयत्न केले, विधान परिषद निवडणुकीनंतर आता ते नांदेड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत.