Burnhams Strong Competition For Prime Minister In Britain
पंतप्रधानपदासाठी बर्नहॅम आघाडीवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
स्टार्मर यांनी लेबर पक्षाचे नेते पीटर मँडलसन यांची अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा हा निर्णय कमालीचा वादग्रस्त ठरला. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील एपस्टीन फाइलमध्ये मँडलसन यांचे नाव आल्यानंतरही स्टार्मर यांनी ही नियुक्ती केली होती. यामुळे लेबर पक्षावर कमालीची टीका झाली. लेबर पक्षापुढे सध्या ग्रीन पार्टी व रिफॉर्म यूके पार्टी या पक्षांच्या वाढत्या लोकप्रियतेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पक्षांचा प्रभाव कमी करण्यात स्टार्मर अपयशी ठरले, अशी पक्षाची भावना आहे.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लेबर पक्षाचे अँडी बर्नहॅम यांचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दहा वर्षांत ब्रिटनच्या एकाही पंतप्रधान ाने आपला कार्यकाळ पूर्ण केला नसून या दशकात सहा पंतप्रधान लाभले आहेत.राजीनामा दिल्यानंतर स्टार्मर आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीसाठीचे वेळापत्रक घोषित करणार आहेत. त्यानुसार येत्या काही आठवड्यात ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची निवड होणे अपेक्षित आहे. स्टार्मर यांचा उत्तराधिकारी सप्टेंबरमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारेल. ‘नवा पंतप्रधान निवडला जाईपर्यंत मी या पदाची जबाबदारी सांभाळीन व भावी पंतप्रधानास पूर्ण सहकार्य करीन. सत्तेचे हे हस्तांतरण विहित प्रक्रियेनुसार होईल याची मी ग्वाही देतो,’ असे ६३ वर्षीय स्टार्मर यांनी सांगितले.
‘माझा कार्यकाळ यशस्वी’
जुलै २०२४मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पक्षाचा दणदणीत विजय झाला होता. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर सुरुवातीस स्टार्मर यांना अमाप लोकप्रियता लाभली होतृृी. परंतु कालांतराने त्यांची; तसेच, पक्षाची लोकप्रियता घटत गेली. स्टार्मर यांनी मात्र आपली कारकीर्द यशस्वी असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानपदाचा खो-खो
स्टार्मर यांच्यापूर्वी लिझ ट्रस या पंतप्रधानपदी होत्या. मात्र त्यांचा कार्यकाळ अवघा दीड महिन्यांचा ठरला. त्यांच्यापूर्वी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी सुमारे २० महिने ब्रिटनचे पंतप्रधानपद सांभाळले. त्यापूर्वी बोरिस जॉन्सन आणि थेरेसा मे या पंतप्रधानपदी होत्या. मे यांच्यापूर्वी डेव्हिड कॅमेरॉन यांच्याकडे सूत्रे होती.