‘मुस्लिम समाजाचे होतेय खच्चीकरण’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
marginalization of the muslim community political parties accused
नवी दिल्ली : ‘देशातील मुस्लिमांचे सामाजिक आणि राजकीय खच्चीकरण, तसेच मशिदी व मदरसे उद्ध्वस्त करण्याबाबत काँग्रेससह धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय पक्ष ‘गुन्हेगारी मौन’ बाळगत आहेत. मुस्लिम समाज त्यांच्यासाठी केवळ एक मतपेटी आहे,’ असा आरोप अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केला.

मुस्लिम समाजाच्या खच्चीकरणाविरोधात लवकरच देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय दिल्लीत रविवारी झालेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारी बैठकीत घेण्यात आला.
देशातील मुस्लिम समाजाची खालावलेली स्थिती, जातीय तणाव आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन यावर एक सर्वसमावेशक दस्तावेज तयार करून प्रकाशित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यातून सद्सद्विवेकबुद्धी जागृत करता येईल, अशी बोर्डाला आशा आहे.