Brutal Murder Of Youth With Iron Rod And Stone In Paithan
गज, दगडाने ठेचून युवकाचा खून
महाराष्ट्र टाइम्स•
पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तर परिसरात बाभळीच्या झाडांमध्ये एका २७ वर्षांच्या युवकाचा मृतदेह आढळला. या युवकाला लोखंडी गज आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली. मृत युवकाचे नाव अमोल उर्फ प्रभू भास्कर सुरडकर (रा. संजयनगर, कातपूर) असे आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी उत्तर भागातील झाडाझुडपात एक युवक बेशुद्ध असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तो मृतावस्थेत होता. शरीरावर जखमेच्या खूणा होत्या. प्राथमिक पाहणीत युवकाला लोखंडी गज तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची प्राथमिक समोर आली. या प्रकरणानंतर न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले.एमआयडीसी पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संशयित दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांमधून एक जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.