व्हाचा चीक बनवण्यासाठी गहू तीन दिवस पाण्यात भिजवून, मिक्सरमध्ये वाटून त्याचा पांढरा अर्क (दूध) काढला जातो. याचा वापर कुरडया, पापड किंवा चीक (उकडीचा पदार्थ) बनवण्यासाठी केला जातो. माझी आजी तो अतिशय उत्कृष्ट बनवित असे. गावी गेल्यावर तीक खाण्याची मजा वेगळीच असे.
आजी गहू स्वच्छ निवडून धुवून घेत असे. मग मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घालून तो तीन दिवस भिजत ठेवत असे. रोज सकाळी व संध्याकाळी त्यातलं पाणी बदलत असे. असं केल्यानं गव्हाला आंबट वास येत नाही, असं ती सांगे. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मऊ झालेले गहू मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून घेत असे. वाटलेल्या गव्हाचं मिश्रण सुती कपडा किंवा गाळणीने गाळून घेऊन पांढरा चीक/दूध वेगळं करीत असे. गव्हाचा चीक निघेपर्यंत ही प्रक्रिया होत असे. हा चीक रात्रभर ठेवल्यावर सकाळी त्याचा घट्ट भाग तळाशी बसत असे. मग ती पातेल्यात पाणी उकळायला ठेवून, त्यात मीठ आणि थोडं जिरं/ओवा घालून शिजवत असे.








