स्वाक्षरी सोहळ्याचा पाकिस्तान आयोजक?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या स्वाक्षरी समारंभाचे यजमानपद भूषवणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली. हा करार शांतता आणि संवादाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या प्रयत्नांनंतर दोन्ही देशांनी लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली. हा शांततेसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे.

स्वाक्षरी सोहळ्याचा पाकिस्तान आयोजक?

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या स्वित्झर्लंडमधील स्वाक्षरी समारंभाचे यजमानपद पाकिस्तान भूषवणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी सांगितले. ‘हा केवळ दोन देशांमधील करार नाही, तर शांतता आणि संवादाचा विजय आहे. हे एक राजनैतिक यश आहे’, असे शाहबाज यांनी म्हणाले.

जागतिक ऊर्जासाखळीसाठी धोका ठरत असलेला हा संघर्ष संपवण्यासाठी पाकने केलेल्या प्रयत्नांची माहिती शाहबाज यांनी संसदेत दिली. त्यांनी या कराराचे वर्णन शांततेसाठी ऐतिहासिक टप्पा असे केले.

‘तीन महिने आणि १६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अमेरिका आणि इराणने लेबनॉनसह सर्व ठिकाणची लष्करी कारवाई त्वरित आणि कायमस्वरूपी थांबवण्याची घोषणा केली. वाटाघाटींच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अमेरिका आणि इराणच्या नेतृत्वाने कठीण परिस्थितीत संयम आणि समंजसपणा दाखवला. त्यामुळे जगाला हा महत्त्वाचा दिवस पाहता आला आहे,’ असे शाहबाज म्हणाले.