२४ लाखांचा ऐवज सदनिकेतून लंपास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील मधुबन सोसायटीत घरफोडी झाली. देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या सदनिकेतून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून २४ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरला. यात १२ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि सहा लाखांची रोकड होती. पर्वती पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना १२ ते १४ जून दरम्यान घडली.

valuable items worth 24 lakh stolen in pune important information coming

पुणे : चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) मधुबन सोसायटीत १२ ते १४ जूनदरम्यान घडली. या सदनिकेत राहणारे कुटुंबीय देवदर्शनासाठी गेले असताना, चोरट्यांनी घरफोडी केली. या प्रकरणी ५१ वर्षीय महिलेने पर्वती पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारदार महिला कुटुंबीयांसमवेत १२ जून रोजी देवदर्शनासाठी गेली होती. कुटुंबासह त्या घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. आत गेल्यावर कपाटात ठेवलेले १२ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि सहा लाखांची रोकड, असा २४ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक किरण पवार तपास करीत आहेत.