विश्रांतवाडीत गुरुवारी पाणी नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. विमानतळ चौकात ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. या कामासाठी मुख्य जलवाहिनी हलवली जाणार आहे. यामुळे विमाननगर, विश्रांतवाडी आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी मिळणार नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. १७ आणि १९ जून रोजी पाणीपुरवठा सुरळीत होईल.

water supply completely halted in vishrantwadi for cement grade separator project as water pipeline is being relocated

पुणे : विमानतळ चौकात उभारण्यात येत असलेल्या ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या कामासाठी ६०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यात येणार असल्याने गुरुवारी (१८ जून) विमाननगर, विश्रांतवाडी आणि परिसरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ही माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

महापालिकेच्या वतीने १८ जून रोजी जलवाहिनी स्थलांतराचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशनगर, कळस, हमके वस्ती, जाधव वस्ती, माळवाडी, वडारवाडी, संजय पार्क, धानोरीतील काही भाग, विमाननगरचा काही परिसर, विश्रांतवाडीतील विमानतळ रस्त्यालगतचे भाग, नगर रस्त्यावरील दीपपार्क व पराग सोसायटी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. १७ व १९ जून रोजी या भागांना नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.