अध्यक्षपदी डॉ. प्रवीण डेरे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अध्यक्षपदी डॉ. प्रवीण डेरे
छत्रपती संभाजीनगर : टुरिझम अँड ट्रॅव्हल असोसिएशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेच्या सर्वसाधारणसभेत करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीण डेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची निवडही याच बैठकीत जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर टुरिझम अँड ट्रॅव्हल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आली. तत्कालीन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. यामुळे सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीण डेरे यांची निवड करण्यात आली. यानंतर अन्य पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी अनिल कहाळे, सचिव पदी मदन जैस्वाल, सहसचिवपदी ईश्वरसिंग सूर्यवंशी, कोषाध्यक्षपदी विवेक राऊत यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार पदी प्रसन्ना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारिणी सदस्य पदी विनोद पाटील, आमेर हुसेनी, सचिन ठोले, सचिन पानगावकर, विलास हिवाळे यांचीही उपस्थिती होती.

क्रिकेट संघटनेसाठी
आज होणार मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एडीसीए) सहसचिव व पाच सदस्यपदांसाठी मंगळवार २३ जून रोजी मतदान होत आहे. संघटनेतील अन्य पदांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी सकाळी अकरा ते दोन या वेळेत सिडको एन दोन येथील एडीसीए क्रिकेट मैदानावर मतदान होईल. मतमोजणी होऊन सायंकाळी पाचनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी अध्यक्ष अतुल सावे, उपाध्यक्ष सचिन मुळे, उमेश डबरी, सचिव शिरीष बोराळकर, खजिनदार अनिल इरावणे आदींची बिनविरोध निवड झाली आहे. सहसचिव पदासाठी अतुल कराड व करणसिंग डोग्रा यांच्यात थेट लढत आहे. पाच सदस्य निवडायचे असून त्यासाठी सुधीर भालेराव, सुशील वकील, निखिल मिटकर, महिंद्रसिंग कानसा, हेमंत मुळे, मोहन बोरा, गौतम नंदावत, पवन डोंगरे, सुयोग माच्छर, इक्बाल सिद्दीकी यांच्यात लढत आहे. १८ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीचे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.