छ. संभाजीनगर विमानतळाचा विकास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rapid development of chhatrapati sambhajinagar airport
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांत शहरातील विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. या विमानतळावर दर तासाला चार विमाने उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन हजारपेक्षा अधिक प्रवाशांच्या जाण्या-येण्याचीही सुविधा करण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून विमानतळाच्या विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘डिपार्चर गेट’ही वाढविण्यात आली आहेत; तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी प्रवेशाची आणि बाहेर पडण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सुरू होण्यासाठी अडचण राहणार नाही, असे सांगण्यात आले.