भोंदू खरातविरुद्ध आजपासून खटला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
trial against bhondu kharat begins in nashik
नाशिक : दैवी शक्ती, भविष्यातील भीती, मंत्रांच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोक एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या विरूद्ध नाशिक शहरात नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या खटल्याला आजपासून (२३ जून) सुरुवात होत आहे.

नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून, या खटल्यात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. गेल्या १८ मार्चपासून खरात विविध गुन्ह्यांमध्ये कोठडीत आहे. या खटल्यात निकम यांच्यासोबतच अहिल्यानगरचे वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.