अजित पवार यांचेबारामतीत स्मारक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अजित पवार यांचेबारामतीत स्मारक
बारामती : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी बारामतीत जागतिक दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे. बारामती नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली. ३.५ एकर जागेत स्मारक उभारले जाईल.

संबंधित वृत्त...२
मेस्सीने रचला इतिहास

अर्लिंग्टन (टेक्सस) : लिओनेल मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रियावर २-०ने मात केली. मेस्सीने या वर्ल्ड कपमधील पहिल्या लढतीत हॅटट्रिक नोंदवली होती. यासह मेस्सी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याच्या नावावर १८ गोल जमा झाले.

संबंधित वृत्त...९

थानी-मोदी चर्चा

नवी दिल्ली : कतारचे आमिर तमिम बिन हमद अल थानी यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कतारमधील गॅस प्रकल्पात आग लागून १२ भारतीयांचा मृत्यू झाल्याबद्दल थानी यांनी दु:ख व्यक्त केले. जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. मोदी यांनी थानी यांचे आभार मानले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकदिलाने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे मोदी म्हणाले.