Modi Governments New Method For Smoothly Conducting Neet Exam
‘रक्षक शिक्षकच भक्षक’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
पुढील वर्षी ‘नीट’ प्रवेश परीक्षा पूर्ण संगणकीकृत व सामायिक पध्दतीने (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. काही लोक जाणीवपूर्वक शिक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ते कोचिंग सेंटर्स असोत किंवा शिक्षण माफिया, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असे प्रधान म्हणाले.
पुढील वर्षी ‘नीट’ प्रवेश परीक्षा पूर्ण संगणकीकृत व सामायिक पध्दतीने (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. काही लोक जाणीवपूर्वक शिक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ते कोचिंग सेंटर्स असोत किंवा शिक्षण माफिया, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असे प्रधान म्हणाले.‘रक्षक असलेले शिक्षकच भक्षक बनले आहेत,’ असा शब्दांत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी ‘नीट-यूजी’ पेपरफुटीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, ‘नीट’ची फेरपरीक्षा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगून, पेपरफुटी ही सामाजिक समस्य असून, केंद्र सरकार परीक्षा यंत्रणा निर्दोष करणार असल्याचा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला.
‘नीट यूजी’ फेरपरीक्षा पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी मंगळवारी दिवसभर विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या. ‘ज्या शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार केली होती, त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले होते. ज्या शिक्षकांवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) इतका विश्वास ठेवला होता, ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आणि स्वतःच भक्षक बनले,’ असे प्रधान म्हणाले.
प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. आरोपींवर दिवाणी खटलेही दाखल केले जातील. त्यांची मालमत्ताही जप्त केली पाहिजे. सीबीआय देशभरात या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे, असे प्रधान यांनी सांगितले.
‘यंदाचा आधीचा कटू अनुभव पाहता फेरपरीक्षा घेताना काटेकोर काळजी घेतली. ‘नीट’ची प्रश्नपत्रिका तयार करणे हे सर्वांत मोठे आव्हान होते. यावेळी तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली होती आणि प्रश्नपत्रिकेची व्याप्तीही वाढवण्यात आली होती. कोणता संच अंतिम असेल, हे कोणालाच माहीत नव्हते. नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांना हे सर्व दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. या शिक्षकांना अनेक दिवस इंटरनेटशिवाय ठेवण्यात आले होते. यामुळेच सर्व काही सुरळीत पार पडले,’ असे प्रधान यांनी सांगितले.
‘या वेळी बहुस्तरीय देखरेख करण्यात आली आणि राज्य व केंद्रीय दलांचीही मदत घेण्यात आली. पाऊस आणि इतर कारणांमुळे, आम्ही वाहतुकीसाठी हवाई दलाची मदत घेतली. हवाई दलाने देशभरात प्रश्नपत्रिका पोहोचवल्या’, असे प्रधान यांनी सांगितले. ‘सीबीएसई’च्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबद्दल प्रधान म्हणाले, की दोन तासांत ‘सीबीएसई’च्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवर ३.८ दशलक्ष सायबर हल्ले झाले. काही लोकांना गोंधळ निर्माण करायचा आहे. देशाला नवीन परीक्षा पद्धतीचा अवलंब करावा लागेल, असे ते म्हणाले.