विजय यांच्या खासगी जीवनावर हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
personal attack on vijay stalins criticism
चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर राजकीय हल्ला करताना विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी आता वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. विजय यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी डिसेंबर २०२५ मध्ये चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात २७ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

स्टॅलिन म्हणाले, ‘विरोधी पक्षांच्या चिथावणीमुळे शेतकरी आंदोलन करत असल्याचे सांगून विजय यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांची ही ‘लघुकथा’ शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेच्या पूर्णपणे विरोधात आहे. पतीचा शोध घेणाऱ्या पत्नीची गोष्ट तमिळनाडूला ठाऊक आहे.’