गुजरात : वनाधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुजरातमधील सत्र न्यायालयाने मंगळवारी डेडियापाडा येथील आम आदमी पक्षाचे आमदार चैतर वसावा यांच्यासह आठ जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
शिक्षा झालेल्यांमध्ये आमदाराच्या पत्नीचाही समावेश आहे. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर वसावा यांची आमदारकी रद्द झाली असून, त्यांची जागा रिक्त झाल्याचे विधानसभेच्या उपाध्यक्षांनी जाहीर केले.