‘तृणमूल काँग्रेस’साठी वाद तीव्र

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
tension rises in trinamool congress mamata banerjee versus ritabha banerjee
तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पक्षावरील नियंत्रणासाठीचा संघर्ष मंगळवारी आणखी तीव्र झाला. बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवून नव्या अध्यक्षांची निवड केली असताना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना करून पदाधिकाऱ्यांची सुधारित यादी निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचा दावा केला.

बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९८मध्ये स्थापन झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या २४ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारी पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार सुधारित यादी सोमवारी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. बंडखोर गटाने ऋतबत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्यात विशेष अधिवेशन घेऊन समांतर कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वीच ममता यांनी पक्षाध्यक्ष या नात्याने प्रक्रिया पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बंडखोरांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.