बेंगळुरूमधील ‘नीट’ परीक्षार्थीच्या हुकलेल्या परीक्षेबाबत पोलिसांच्या ‘सत्यशोधना’त विविध कारणे पुढे आली आहेत. परीक्षेसाठी उशिरा निघणे, लांबचा मार्ग निवडणे यामुळे एका विद्यार्थ्याची २१ जूनची ‘नीट’परीक्षा हुकली, असे पोलिसांनी सांगितले. आरटीनगरमधील संबंधित उमेदवार आणि त्यांचे पालक यांच्याशी केलेली चर्चा; तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि मार्गाचे विश्लेषण या आधारे हा खुलासा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘नीट’ उमेदवार केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पोहोचला होता. हा विलंब प्रामुख्याने घरातून उशिरा निघणे आणि मार्गाची निवड यामुळे झाला होता, हे पडताळणीअंती दिसून आले,’ असे सीसीटीव्ही पडताळणीवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.